चंद्रपूर : ट्रकमधून ३५ गोवंश यांची अवैध वाहतूक
चंद्रपूर, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। पळ काढणाऱ्या ट्रकचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ पाठलाग करून भद्रावती येथे ट्रक ताब्यात घेतला. त्या ट्रकमधून ३५ गोवंश यांची अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्
चंद्रपूर : ट्रकमधून ३५ गोवंश यांची अवैध वाहतूक


चंद्रपूर, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। पळ काढणाऱ्या ट्रकचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ पाठलाग करून भद्रावती येथे ट्रक ताब्यात घेतला. त्या ट्रकमधून ३५ गोवंश यांची अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली. यावेळी १० चाकी ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक न थांबवता भद्रावतीच्या दिशेने पळ काढला. पथकाने तात्काळ पाठलाग करून सब स्टेशन पावर ग्रेड, जुना सुमठाणा, भद्रावती येथे ट्रक ताब्यात घेतला. तेव्हा सदर ट्रकमधून ३१ गायी व ४ बैल अश्या ३५ गोवंश यांची अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.

कारवाईदरम्यान चालक व क्लिनर अशा दोन आरोपींना ताब्यात घेऊन ट्रक, ३५ गोवंश व २ मोबाईल हँडसेट असा एकूण २२.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुषण ओमकार तरारे (२४), रा. आझादनगर, कामठी, नागपूर व सयद जसिन सयद असलम (३३), रा. ताजबाग चौक, नागपूर या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande