नांदगाव खंडेश्वरमध्ये विनापरवाना कृषी निविष्ठांची वाहतूक उघड; दोघांवर गुन्हा
मरावती, ४ ऑगस्ट (हिं.स.) : नांदगाव खंडेश्वर बसस्थानकाजवळ विनापरवाना कृषी निविष्ठा व रासायनिक खतांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीसह रासायनिक खते (नियंत्रण)
नांदगाव खंडेश्वरमध्ये विनापरवाना कृषी निविष्ठांची वाहतूक उघड; दोघांवर गुन्हा


मरावती, ४ ऑगस्ट (हिं.स.) : नांदगाव खंडेश्वर बसस्थानकाजवळ विनापरवाना कृषी निविष्ठा व रासायनिक खतांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीसह रासायनिक खते (नियंत्रण) आदेशांतर्गत नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तालुका कृषी अधिकारी संजय नारायण पाटील यांच्या तक्रारीवरून ही कारवाई केली. कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बसस्थानकाजवळ एमएच-२७-बीई-९४६८ क्रमांकाच्या कारची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात संशयास्पद कृषी निविष्ठा आणि रासायनिक खतांचा साठा आढळून आला.

चौकशीत संबंधितांकडे या मालाच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेला अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. कारमधून कॅल्शियमच्या पाच भरण्या, झिंकच्या दहा भरण्या तसेच बोरॉन, अमिनो अॅसिड आणि मायक्रो न्यूट्रिशंटसह एकूण सुमारे १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी ज्ञानेश रघुनाथ तळेकार (वय ३९) व अनंत रघुनाथ तळेकार (वय ४५, दोघेही रा. उत्तमनगर, अमरावती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेला कृषी माल नेमका कोठून आणण्यात आला होता आणि त्यामागील साखळी काय आहे, याचा तपास कृषी विभाग आणि पोलिसांकडून सुरू आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande