महिलेवर हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास; तळा परिसरात खळबळ
रायगड, ४ ऑगस्ट (हिं.स.) : तळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरई आदिवासीवाडी मार्गावर एका महिलेवर हल्ला करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची चैन हिसकावून अज्ञात चोरट्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तळा पोलीस ठाण्
Gold chain snatched from woman on her way to work; case registered against unknown person.


Gold chain snatched from woman on her way to work; case registered against unknown person.


रायगड, ४ ऑगस्ट (हिं.स.) : तळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरई आदिवासीवाडी मार्गावर एका महिलेवर हल्ला करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची चैन हिसकावून अज्ञात चोरट्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बेलघर येथून गावातील एका परिचित व्यक्तीच्या दुचाकीवरून कामासाठी निघाल्या होत्या. गौळवाडी येथे दुचाकीवरून उतरल्यानंतर त्या चरई आदिवासीवाडीच्या दिशेने पायी जात होत्या.

सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास त्या नदीवरील पुलाजवळील स्मशानभूमी परिसरातील जंगलरस्त्यावर पोहोचल्या असता, पाठीमागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या तोंडावर हात दाबला. त्यानंतर आरोपीने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेतली.

यावेळी आरोपीने महिलेला धक्का देऊन खाली पाडले आणि जंगलाच्या दिशेने पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६७/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार खैरनार करीत आहेत.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande