बीड - गेवराई पोलीस ठाणे हद्दी अंतर्गत दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांकडून अटक
बीड, 04 ऑगस्ट (हिं.स.)। बीडच्या गेवराई पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केले त्याच्याकडून अनेक दुचाकी जप्त केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गेवराई उपविभागात चो
पोलिसांनी केली दुचाकी चोराला अटक


बीड, 04 ऑगस्ट (हिं.स.)। बीडच्या गेवराई पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केले त्याच्याकडून अनेक दुचाकी जप्त केल्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गेवराई उपविभागात चोरीच्या मोटारसायकलींचा शोध घेत होते. त्यावेळी जातेगाव रोड, गेवराई येथे चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयित मच्छिंद्र बबन राठोड (रा. मानसिंगतांडा, ता. गेवराई) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून पाच मोटारसायकली, अंदाजे २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande