पुणे विद्यापीठाच्या बनावट बी.कॉम. प्रमाणपत्र प्रकरणी आणखी एकाला अटक
पुणे, 05 ऑगस्ट, (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाने बी.कॉम. शाखेची बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र तयार करून ७० हजार रुपयांना विकल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. तपासात संबंधित आरोपीनेच बनावट क
University Pune SPUU


पुणे, 05 ऑगस्ट, (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाने बी.कॉम. शाखेची बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र तयार करून ७० हजार रुपयांना विकल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. तपासात संबंधित आरोपीनेच बनावट कागदपत्रे तयार केल्याचे समोर आले असून, अशाच प्रकारे आणखी काही विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची माहितीही उघड झाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रदीप महादेव खताते (वय ५३, रा. वारजे माळवाडी) असे आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून विद्यापीठातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर (वय ४८, रा. शिंदेनगर, जुनी सांगवी) याच्यासह त्याच्याविरोधात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रमेश मुखेकर हा विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाशी संबंधित कर्मचारी असून परीक्षा विभागात कार्यरत आहे. त्याने एका विद्यार्थ्याच्या वडिलांना त्यांचा मुलगा बी.कॉम. पदवीधर झाल्याचे भासवून बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे.

तपासादरम्यान प्रदीप खताते याने ही बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र तयार करून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आणखी काही विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे बनावट कागदपत्रे पुरविण्यात आली का, याचा तपास चतुःश्रृंगी पोलिसांकडून सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande