अमरावती : मोर्शीत घरामागे लावलेली गांजाची पाच झाडे जप्त; गुन्हा दाखल
अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) :मोर्शी पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एका व्यक्तीच्या घरामागे लावलेली गांजाची पाच झाडे जप्त केली आहेत. ही कारवाई मंगळवारी (४ ऑगस्ट) मोर्शी शहरातील गाडगेनगर परिसरात करण्यात आली पोलिसांना मिळाल
मोर्शी पोलिसांची धडक कारवाई घरामागे लावलेली गांजाची ५ झाडे जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल


अमरावती, ५ ऑगस्ट (हिं.स.) :मोर्शी पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एका व्यक्तीच्या घरामागे लावलेली गांजाची पाच झाडे जप्त केली आहेत. ही कारवाई मंगळवारी (४ ऑगस्ट) मोर्शी शहरातील गाडगेनगर परिसरात करण्यात आली

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अनिल रामजी पंधरे (वय ३७ वर्षे, रा. वॉर्ड क्रमांक १५, गाडगेनगर, मोर्शी) याने आपल्या राहत्या घराच्या मागील बाजूस गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार राजपत्रित अधिकारी, पंच आणि न्यायसहायक वैज्ञानिक पथकाच्या उपस्थितीत घराची झडती घेण्यात आली. यावेळी घराच्या मागील परिसरात गांजाची पाच झाडे आढळून आली. पंचनामा करून ही झाडे जप्त करण्यात आली.

न्यायसहायक वैज्ञानिक पथकाने केलेल्या प्राथमिक तपासणीत जप्त करण्यात आलेली झाडे गांजाची असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी अनिल पंधरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande