
आंतरराज्य टोळीतील मुख्य सूत्रधार राजस्थानातून जेरबंदराजापेठ पोलिस स्टेशन पथकाची धडक कारवाई
अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)
शहरात मोठया प्रमाणात अवैध्यरित्या मेफेड्रान (एम.डी.) अंमली पदार्थाचा पुरवठा करणारा आंतरराज्य टोळीतील मुख्य सुत्रधाराला राज्यस्थानातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राजापेठ पोलिस स्टेशनच्या पथकाने ही मोठी धडक कारवाई केली. रामनिवास जगदिशकुमार बिश्नोई (वय 22 वर्ष रा. डुंगरवा तहसिल बागोडा, जिल्हा जालौर राजस्थान) असे अटकेतील आंतरराज्यीय टोळीतील तस्कराचे नाव आहे.तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे उल्लेखनिय अशी प्रभावी कार्यवाही केली आहे.
पोलीस आयुक्त यांनी शहरातील अंमली पदार्थाची साठवणूक, विकी व वाहतुक करणाऱ्या इसमांवर प्रभावी कार्यवाही करून अंमली पदार्थ विरोधात मोहिम बविण्याबाबत आदेश प्राप्त झाले होते. यांवरून पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस स्टेशन राजापेठ अमरावती शहर यांचे नेतृत्वात पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी १ ऑगस्ट रोजी राजापेठ पोलिसांनी गुप्त माहितीचे आधारे आरोपी साहील राजेश मेहरा (वय 22, रा. शिवाजी संकुल, अकोली रोड) यास ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून एम.डी पावडर कि.अं. 41,55,000 रुपये, एक ईलेक्ट्रानिक वजन काटा 4,000 रु., चारचाकी वाहन 10,00,000 रुपये, २ मोबाईलफोन 1,70,000 रु. असा एकूण 53,29,050 रू. मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन राजापेठ, अमरावती शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हाची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात असल्याने, सदर गुन्हाचा तपास वरिष्ठ अधिकारी यांचे आदेशान्वये करत असतांना, नमुद आरोपी यांनी सदरचा (एम.डी.) मॅफेडॉन अंमली पदार्थ हा त्याने राज्य राजस्थान मधील आरोपी मोबाईल क्रमांक 8302472584 व 8003802990) याचे सोबत व्हॉटस अॅप द्वारे वारंवार संपर्क करून, आणल्याचे सांगितले होते.
गुन्हाचे तपासात पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनात व त्यांचे आदेशान्वये पाहीजे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस स्टेशन राजापेठ, अमरावती शहर चे गुन्हे प्रकटिकरण पथक राजस्थान राज्यात जावून तेथे काही दिवसांपासून रात्र दिवस सतत अथक परिश्रम व वेशांतर करून तेथील स्थानीक पोलीसांचे सहाकार्याने तांत्रिक माहीतीचे आधारे पाहीजे आरोपी रामनिवास जगदिशकुमार बिश्नोई वय 22 वर्ष रा. डुंगरवा तहसिल बागोडा, जिल्हा जालौर राजस्थान याचा शोध घेतला आणि ताब्यात घेतले. तसेच आणखी एक आरोपी फरार झाला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परि - 2, श्याम घुगे, सहायक पोलीस आयुक्त संजय खताळे, यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात स.पो.नि. नितीन शिदे, पोलीस अंमलदार मनिष करपे, पंकज खटे, रवि - लिखितकर, शशीकांत शेळके, पवन तिवारी, अर्जुनकदम, रफिक खान, अंकुशकाळे, पंकज माठे, आकाश यादव, प्रशांत बोलोरकर, अमोल देशमुख यांनी केली.----------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी