एडेलवाईसच्या EAAA चे पुण्यातील ऑफिस पार्कचे अधिग्रहण
* व्यावसायिक रिअल इस्टेट पोर्टफोलिओ 50 लाख चौरस फूटांपेक्षा अधिक मुंबई, 06 ऑगस्ट (हिं.स.) - एडेलवाईसच्या पर्यायी गुंतवणूक (Alternatives) व्यवसायाचा भाग असलेल्या EAAA ने आपल्या प्रमुख व्यावसायिक रिअल इस्टेट फंड Rental Yield Plus (RYP) मार्फत पुण्या
Edelweiss EAAA


* व्यावसायिक रिअल इस्टेट पोर्टफोलिओ 50 लाख चौरस फूटांपेक्षा अधिक

 

मुंबई, 06 ऑगस्ट (हिं.स.) - एडेलवाईसच्या पर्यायी गुंतवणूक (Alternatives) व्यवसायाचा भाग असलेल्या EAAA ने आपल्या प्रमुख व्यावसायिक रिअल इस्टेट फंड Rental Yield Plus (RYP) मार्फत पुण्यातील सुमारे 10 लाख चौरस फूट ग्रॉस लीजेबल एरिया (GLA) असलेल्या ग्रेड A ऑफिस पार्कचे अधिग्रहण केल्याची घोषणा आज केली. या अधिग्रहणानंतर RYP चा एकूण पोर्टफोलिओ 52 लाख चौरस फूटांपर्यंत वाढला असून, त्यामध्ये सुमारे 10 लाख चौरस फूट क्षेत्रफळासाठी बंधनकारक करार (Binding Contracts) समाविष्ट आहेत.

या टप्प्यामुळे RYP ची भारतातील प्रमुख कार्यालयीन बाजारपेठांमध्ये, जसे की बंगळुरू, गुरुग्राम आणि आता पुणे, अधिक मजबूत उपस्थिती निर्माण झाली आहे. उच्च दर्जाच्या, संस्थात्मक दर्जाच्या कार्यालयीन मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून स्थिर उत्पन्न, चांगला परतावा आणि सक्रिय मालमत्ता व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्यावर RYP चे सातत्याने लक्ष आहे.

पुण्यातील ही मालमत्ता RYP ची पाचवी गुंतवणूक असून महाराष्ट्रातील पहिली गुंतवणूक आहे. पुण्यातील प्रमुख कार्यालयीन परिसरांपैकी एका ठिकाणी असलेली ही मालमत्ता 95 टक्के भाड्याने दिलेली असून, विविध नामांकित कंपन्या येथे भाडेकरू आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच स्थिर उत्पन्न मिळण्याची स्पष्टता आहे. तसेच, पुढील काळात नवीन भाडेकरार, कार्यक्षमतेत सुधारणा आणि करारातील नियमित भाडेवाढीव्यतिरिक्त भाडे अनुकूलन (Rental Optimization) यांसारख्या उपक्रमांमुळे अधिक मूल्यनिर्मितीची संधी उपलब्ध आहे.

EAAA Alternatives मधील Commercial Real Estate Strategy चे नेतृत्व गौतम होरा करत आहेत. त्यांना 25 वर्षांहून अधिक अनुभव असून, त्यापैकी 20 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी रिअल इस्टेट गुंतवणूक, मालमत्ता व्यवस्थापन आणि पोर्टफोलिओ धोरण या क्षेत्रांत काम केले आहे.

2023 मध्ये पहिला फंड बंद (First Close) झाल्यापासून RYP ने वेगळ्या गुंतवणूक धोरणाचा अवलंब केला आहे. या धोरणाअंतर्गत, मजबूत भाडेपट्टा क्षमता असलेल्या प्रस्थापित बाजारपेठांतील उच्च दर्जाच्या, कार्यरत ग्रेड A आणि A+ संस्थात्मक कार्यालयीन मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यात येते. दीर्घकालीन करारांद्वारे नामांकित कंपन्यांना भाड्याने दिलेल्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून आकर्षक परतावा आणि स्थिर उत्पन्न मिळवण्यावर RYP भर देतो. तसेच, तंत्रज्ञानाधारित विश्लेषणाच्या मदतीने मालमत्तेची कामगिरी सुधारून दीर्घकालीन मूल्यनिर्मिती केली जाते.

पुण्यातील हे अधिग्रहण RYP च्या आधीच्या गुंतवणुकांवर आधारित आहे. यामध्ये International Tech Park Gurgaon (ITPG) – Phase 1, जो GIC आणि CapitaLand कडून विकत घेण्यात आला होता, तसेच MFAR Manyata Greenheart Tech Park, Bengaluru, Embassy Office Parks आणि SP Infocity यांचा समावेश आहे.

EAAA ही भारतातील मोजक्या देशांतर्गत व्यावसायिक रिअल इस्टेट व्यवस्थापकांपैकी एक असून, अधिग्रहण, मालमत्ता सुधारणा, सक्रिय व्यवस्थापन आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मिती यांचा समावेश असलेले एकात्मिक व्यासपीठ (Integrated Platform) तिच्याकडे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande