गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपकडून नवीन कॉर्पोरेट ब्रँड जाहिरात प्रदर्शित
मुंबई, 06 ऑगस्ट, (हिं.स.)। गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपली नवीन कॉर्पोरेट ब्रँड जाहिरात प्रदर्शित केली. या वर्षाच्या सुरुवातीला सादर करण्यात आलेल्या त्यांच्या उदात्त हेतूची आणि ब्रँड ओळखीची ही पहिली मोठी अभिव्यक्ती आहे. ‘ॲट गोदरेज इंडस्ट्रीज, वी
गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपली नवीन कॉर्पोरेट ब्रँड जाहिरात प्रदर्शित


मुंबई, 06 ऑगस्ट, (हिं.स.)। गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपली नवीन कॉर्पोरेट ब्रँड जाहिरात प्रदर्शित केली. या वर्षाच्या सुरुवातीला सादर करण्यात आलेल्या त्यांच्या उदात्त हेतूची आणि ब्रँड ओळखीची ही पहिली मोठी अभिव्यक्ती आहे. ‘ॲट गोदरेज इंडस्ट्रीज, वी क्राफ्ट’ असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती टायगर टेलीच्या झोया अख्तर यांनी केली असून, लाऊडमाऊथ फिल्मचे आकाश भाटिया यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. ग्रुपला घडवणाऱ्या व्यक्ती, व्यवसाय आणि कल्पनांच्या माध्यमातून, ‘1897 पासून भविष्याची निर्मिती’ हा ग्रुपचा उद्देश ही जाहिरात जिवंत करते.

समूहाची कार्यालये, शेती, कारखाने आणि बांधकामाची ठिकाणे, अशा विविध ठिकाणी ही जाहिरात चित्रित करण्यात आली आहे. समूहाच्या विविध व्यवसायांमागील लोक, कार्यपद्धती आणि संकल्पनांवर प्रकाश टाकतो; तसेच, उद्देश आणि महत्त्वाकांक्षा सारखीच असली तरी गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपमध्ये निर्मितीची प्रक्रिया कशी विविध प्रकारे राबवली जाते, हे यात दर्शवले आहे. समूहाच्या विविध व्यवसायांचे स्वतंत्र उद्देश ही जाहिरात एकाच कथानकात गुंफते: ग्राहक उत्पादनांद्वारे चांगुलपणाची निर्मिती, शेतीद्वारे समृद्धी, रिअल इस्टेटद्वारे आनंद, वित्तीय सेवांद्वारे भरभराट, रसायनांच्या क्षेत्रात नवनिर्मिती आणि विविध उपक्रमांद्वारे प्रेरणा.

केवळ एखादी गोष्ट घडवणे, या पलीकडे जात ही जाहिरात निर्मिती म्हणजे काळजी, कल्पकता आणि जबाबदारी यावर आधारित एक दृष्टिकोन, अशी मांडणी करते. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपमधील रोजच्या कामातून ही जाहिरात एका विश्वासाचे दर्शन घडवते: तो म्हणजे, नवनिर्मिती, सुधारणा आणि चिरकाल टिकणाऱ्या गोष्टींची उभारणी करणाऱ्या लोकांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने प्रगती आकाराला येते. समूहाचे संस्थापक अर्देशिर गोदरेज यांच्या कार्यात या भावनेचा उगम दिसून येतो; त्यांच्या जीवनकार्याने हे सिद्ध केले की, नावीन्य, सचोटी आणि महत्त्वाकांक्षा यांचा जेव्हा संगम होतो, तेव्हा त्या सर्वात प्रभावी ठरतात.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी गोदरेज इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रँड अधिकारी, तान्या दुबाश म्हणाल्या, या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही आमचे हेतू स्पष्ट केला - 1897 पासून भविष्याची निर्मिती. गेल्या शतकभराहून अधिक काळ आमच्या विविध व्यवसायांना परस्परांशी जोडणाऱ्या धाग्याचे हे एक प्रकटीकरण आहे. आमच्या समूहाला दररोज आकार देणारी माणसे, कल्पना आणि महत्त्वाकांक्षा यांच्या माध्यमातून हा हेतू जिवंत ठेवण्याचे काम ही जाहिरात करते. शंभरहून अधिक वर्षांपासून सातत्याने प्रगती आणि विकास साधणाऱ्या समूहाच्या दृष्टीने, पुढील शंभर वर्षातही काळाच्या ओघात सुसंगत राहण्यासाठी मूल्ये आणि कामगिरी, तसेच नावीन्य आणि जबाबदारी या गोष्टींचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते.

'टायगर टेली'च्या निर्मात्या झोया अख्तर म्हणाल्या, माझ्यासाठी गोदरेज हा एक वारसा आहे. भारतात जन्म होणे आणि लहानाचे मोठे होताना गोदरेजचा आयुष्यात सहभाग नसणे, असे होऊच शकत नाही. जेव्हा मी या संकल्पनेवर काम करायला सुरुवात केली, तेव्हाच मला गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या कार्याची विविधता, व्याप्ती आणि विशालता समजली. ती दुनिया आणि त्या समूहाला जोडणारी सामाईक भावना समजून घेण्याचे एक माध्यम या जाहिरातीमुळे मला मिळाले.

लाऊडमाऊथ फिल्मचे दिग्दर्शक आकाश भाटिया म्हणाले, आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी आणि न दिसणाऱ्या गोष्टी; आप्ल्याला जाणवणाऱ्या आणि न जाणवणाऱ्या गोष्टी, आणि ज्या गोष्टी केवळ बारकाईने निरीक्षण केल्यावरच जाणवतात – या सर्वांमध्ये गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचा सहभाग असतोच. या कथेच्या केंद्रस्थानी लोकांना ठेवून, या सर्व गोष्टी आणि हा समूह ज्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो, त्या सर्वांना पडद्यावर जिवंत करणे हा माझा उद्देश होता. दृश्य आणि अदृश्य गोष्टी, तसेच महत्त्वाकांक्षा आणि अनुभव यांचे चित्रपटासाठीच्या कल्पना, पटकथा आणि दृश्यांमध्ये रुपांतर करण्याचा हा प्रवास अत्यंत रोमांचक होता.

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर ही जाहिरात आता उपलब्ध झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande