SBI म्युच्युअल फंडच्या Magnum SIF अंतर्गत दुसऱ्या गुंतवणूक धोरणाची घोषणा
* Magnum Equity Ex-Top 100 Long Short Fund मुंबई, 06 ऑगस्ट (हिं.स.) - देशातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड संस्था असलेल्या SBI Mutual Fund ने Specialized Investment Fund (SIF) चौकटीअंतर्गत आपल्या दुसऱ्या गुंतवणूक धोरणाची, Magnum Equity Ex-Top 100
SBI म्युच्युअल फंड Magnum SIF


* Magnum Equity Ex-Top 100 Long Short Fund

मुंबई, 06 ऑगस्ट (हिं.स.) - देशातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड संस्था असलेल्या SBI Mutual Fund ने Specialized Investment Fund (SIF) चौकटीअंतर्गत आपल्या दुसऱ्या गुंतवणूक धोरणाची, Magnum Equity Ex-Top 100 Long Short Fund ची घोषणा केली आहे. हा खुल्या स्वरूपाचा (Open-ended) गुंतवणूक निधी असून, तो प्रामुख्याने लार्ज-कॅप कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करेल. तसेच डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून मर्यादित शॉर्ट एक्स्पोजरही घेऊ शकेल. या New Fund Offer (NFO) साठी 7 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत सदस्यता स्वीकारली जाईल.

या गुंतवणूक धोरणाचा उद्देश टॉप 100 कंपन्यांबाहेरील कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली वाढ साधणे हा आहे. परतावा वाढविण्यासाठी किंवा जोखीम नियंत्रित करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह्जद्वारे मर्यादित शॉर्ट एक्स्पोजरचा वापर केला जाईल. मात्र, या गुंतवणूक उद्दिष्टाची पूर्तता होईल याची कोणतीही हमी नाही.

SBI Funds Management Limited चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबाशीष मिश्रा म्हणाले, Magnum Equity Ex-Top 100 Long Short Fund च्या माध्यमातून आम्ही आमच्या Specialized Investment Fund (SIF) प्लॅटफॉर्मचा आणखी विस्तार करत आहोत. भारतातील विकसित होत असलेल्या बाजारपेठेतील संधी लक्षात घेऊन संशोधनाधारित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक उपाय उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचे हे प्रतिबिंब आहे. टॉप 100 कंपन्यांपलीकडील गुंतवणुकीवर भर आणि पद्धतशीर Long-Short रचनेमुळे हा निधी आमच्या उत्पादनांच्या श्रेणीत महत्त्वाची भर घालतो. बदलत्या बाजारपेठेत गुंतवणूकदारांच्या वाढत्या आणि अधिक परिष्कृत अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरेल. दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारी आणि गुंतवणुकीच्या बदलत्या प्रवाहाशी सुसंगत अशी विचारपूर्वक रचना केलेली धोरणे उपलब्ध करून देण्यावर आमचा कायम भर राहील.

या गुंतवणूक धोरणाअंतर्गत एकूण मालमत्तेपैकी 65% ते 100% रक्कम बाजार भांडवलाच्या निकषानुसार टॉप 100 कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये तसेच REITs मध्ये गुंतवली जाईल. याशिवाय, 35% पर्यंत रक्कम टॉप 100 कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये तसेच REITs मध्ये गुंतवता येईल.

तसेच, या धोरणाअंतर्गत 35% पर्यंत रक्कम कर्जरोखे आणि मनी मार्केट साधनांमध्ये, 20% पर्यंत रक्कम InvITs च्या युनिट्समध्ये (SEBI ने घालून दिलेल्या मर्यादेत) आणि 35% पर्यंत रक्कम गोल्ड ETF, सिल्व्हर ETF यांच्यासह विविध म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवता येईल. त्याच किंवा अन्य अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या म्युच्युअल फंड योजनांद्वारे सोन्यातील गुंतवणूक एकूण निव्वळ मालमत्तेच्या 5% पेक्षा जास्त असणार नाही.

या गुंतवणूक धोरणाअंतर्गत लागू असलेल्या नियमांनुसार ADRs, GDRs, परदेशी इक्विटी, Overseas ETFs आणि कर्जरोखे अशा परदेशी सिक्युरिटीजमध्येही गुंतवणूक करण्याची संधी असेल. मात्र, अशा गुंतवणुकीचे प्रमाण या गुंतवणूक धोरणाच्या निव्वळ मालमत्तेच्या 35% पेक्षा अधिक असणार नाही. अधिक माहितीसाठी Investment Strategy Information Document (ISID) पाहावा.

नवीन गुंतवणूकदारांसाठी Magnum SIF मध्ये किमान गुंतवणूक रक्कम ₹10 लाख असून त्यानंतर ₹1 च्या पटीत गुंतवणूक करता येईल. विद्यमान गुंतवणूकदारांसाठी प्रत्येक अर्जामागे किमान ₹1 लाख गुंतवणूक आवश्यक आहे. मात्र, PAN स्तरावर आणि समान होल्डिंग पद्धतीअंतर्गत Magnum SIF च्या सर्व गुंतवणूक धोरणांमधील एकूण विद्यमान गुंतवणूक ₹10 लाखांपेक्षा कमी असता कामा नये. या गुंतवणूक धोरणाचा बेंचमार्क BSE 500 TRI आहे.

या योजनेतील नियमित गुंतवणुकीसाठी, वाटपाच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत युनिट्सची परतफेड किंवा दुसऱ्या गुंतवणूक धोरणात बदल केल्यास लागू NAV वर 1% Exit Load आकारला जाईल. तीन महिन्यांनंतर युनिट्सची परतफेड किंवा बदल केल्यास कोणतेही Exit Load आकारले जाणार नाही.

Magnum Equity Ex-Top 100 Long Short Fund चे व्यवस्थापन गौरव मेहता (CFA), Head – SIF Equity करतील. तेच सध्या Magnum SIF अंतर्गत Magnum Hybrid Long Short Fund चेही व्यवस्थापन करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande