बीड - गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकाला अटक; जिवंत काडतूसासह ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
बीड, 06 ऑगस्ट (हिं.स.)। बीड येथील स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या संयुक्त पथकाने गावठी कट्टा (पिस्तूल) बाळगून फिरणाऱ्या एका युवकाला सापळा रचून अटक केली. आरोपीकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा सुमार
पोलीस कारवाई


बीड, 06 ऑगस्ट (हिं.स.)। बीड येथील स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या संयुक्त पथकाने गावठी कट्टा (पिस्तूल) बाळगून फिरणाऱ्या एका युवकाला सापळा रचून अटक केली. आरोपीकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने आपले नाव तुकाराम गंगाधर करांडे (वय २८), रा. खडकी देवळा, ता. वडवणी, जि. बीड (सध्या रा. स्वराज्यनगर, बीड) असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande