सोलापूर-हडपसर विषारी दारू प्रकरण : टोळीप्रमुखासह 9 जणांवर मकोका
सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.) । हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथॅनॉल मिश्रित विषारी हातभट्टी दारूची अवैध विक्री करून २१ जणांचा मृत्यू घडवून आणणाऱ्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत
सोलापूर-हडपसर विषारी दारू प्रकरण : टोळीप्रमुखासह 9 जणांवर मकोका


सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.) । हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथॅनॉल मिश्रित विषारी हातभट्टी दारूची अवैध विक्री करून २१ जणांचा मृत्यू घडवून आणणाऱ्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई केली आहे.सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांच्या निर्देशानुसार टोळीचा प्रमुख दत्ता उर्फ भाऊ भिवराव लोंढे याच्यासह एकूण नऊ आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात हडपसर परिसरातील चार, तर दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील १७ अशा एकूण २१ नागरिकांचा मिथॅनॉलयुक्त विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाला होता. या दुर्घटनेने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली होती.घटनेनंतर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान ही टोळी संघटित पद्धतीने अवैध दारूची निर्मिती व विक्री करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सीआयडीने आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे प्रकरणातील तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता असून, टोळीच्या आर्थिक व्यवहारांसह इतर गुन्हेगारी नेटवर्कचाही तपास केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande