बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब अल हसनच्या घरावर हल्ला
-शेख हसीना यांच्या कार्यक्रमातील सहभागामुळे कट्टरपंथी संतप्त-शकीब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला ढाका, 06 ऑगस्ट (हिं.स.) बांग्लादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मागुरा-१ मतदारसंघाचे माजी खासदार शकीब अल हसन यांच्या घरावर पेट्र
शाकिब उल हसन


-शेख हसीना यांच्या कार्यक्रमातील सहभागामुळे कट्टरपंथी संतप्त-शकीब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला

ढाका, 06 ऑगस्ट (हिं.स.) बांग्लादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मागुरा-१ मतदारसंघाचे माजी खासदार शकीब अल हसन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला गेला. ही घटना बुधवारी (५ ऑगस्ट) रात्री सुमारे ८:४५ वाजता मागुरा शहरातील केशबमोर भागातील शकीब यांच्या वडिलोपार्जित घरात घडली. घराची तोडफोडही करण्यात आली.

शाकिब आता बांगलादेशात राहत नाही. तो अमेरिकेत स्थायिक झाला आहे. गेल्या वर्षी बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यक्रमासाठी दिल्लीतील फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शकीब श्रीलंकेतून व्हर्च्युअली बोलत असताना हा हल्ला झाला. हा कार्यक्रम शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर दोन वर्षांनी झाला. दोन वर्षांपूर्वी याच दिवशी शेख हसीना यांना देश सोडून भारतात परतण्यास भाग पाडले गेले होते. या कार्यक्रमात शेख हसीना यांनी बांगलादेशात परतण्याबद्दल भाष्य केले होते. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत बांगलादेश सरकारने निष्पाप आणि असहाय्य लोकांवर अत्याचार केले आहेत.

आपल्या आभासी भाषणात, शेख हसीना म्हणाल्या की, नशिबात काहीही लिहिले असले तरी त्या बांगलादेशला परत येतील. त्यांनी दावा केला की, त्यांचे परत येणे सत्तेसाठी नसून देशाला विकास, धर्मनिरपेक्षता आणि समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी आहे. शेख हसीना म्हणाल्या की, मला माहित आहे की ते मला तुरुंगात टाकू शकतात किंवा मारू शकतात. मी माझ्या लोकांकडे घरी परत येईन. डिसेंबर हा आपल्या विजयाचा महिना आहे. त्यामुळे, मला डिसेंबरमध्ये परत यायचे आहे. मला माहित आहे की मी कोणत्याही गोष्टीला सामोरे जाऊ शकते असे त्यांनी सांगितले.

आपल्या भाषणात, लष्करी उठावादरम्यान वडील शेख मुजीबुर रहमान यांच्या झालेल्या हत्येबद्दल बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या की, सध्याच्या संकटाबद्दल बोलण्यापूर्वी, मी राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान, देशाचे प्रख्यात नेते आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील तीस लाख हुतात्म्यांना माझी सखोल आदरांजली अर्पण करते. तसेच, १५ ऑगस्ट १९७५ रोजी मी गमावलेल्या माझ्या कुटुंबीयांचेही मला मोठ्या दुःखाने स्मरण होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande