होर्मुझमध्ये नवा सागरी मार्ग; इराण-ओमान करार अंतिम टप्प्यात
तेहरान, 06 ऑगस्ट (हिं.स.)।होर्मुझ सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी नवी व्यवस्था लागू करण्याच्या दिशेने इराण आणि ओमान अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. इराणच्या एका वरिष्ठ राजनयिकाच्या माहितीनुसार, सध्या लागू असलेल्या तात्पुरत्या उत्तर आणि
होर्मुझमध्ये नवा सागरी मार्ग; इराण-ओमान करार अंतिम टप्प्यात


तेहरान, 06 ऑगस्ट (हिं.स.)।होर्मुझ सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी नवी व्यवस्था लागू करण्याच्या दिशेने इराण आणि ओमान अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. इराणच्या एका वरिष्ठ राजनयिकाच्या माहितीनुसार, सध्या लागू असलेल्या तात्पुरत्या उत्तर आणि दक्षिण मार्गांऐवजी पुढील दोन ते चार महिन्यांसाठी इराणच्या प्रादेशिक सागरी हद्दीतून जाणारा एक नवा एकल सागरी मार्ग लागू करण्याचा प्रस्ताव आहे.

इराणची सरकारी वृत्तसंस्थाला दिलेल्या मुलाखतीत उपपरराष्ट्रमंत्री काझेम घरीबाबादी यांनी सांगितले की, तीन आठवड्यांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर प्रवेश आणि निर्गमन मार्गांच्या नकाशांसह जवळपास सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये तत्त्वतः सहमती झाली आहे.घरीबाबादी यांनी स्पष्ट केले की, या संभाव्य कराराचा अर्थ होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्यात येणार आहे, असा नाही. ही नवी व्यवस्था केवळ व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गापुरती मर्यादित असून, सामुद्रधुनीतील सर्वसामान्य वाहतूक पूर्णपणे पूर्ववत झाल्याचे त्यातून मानता येणार नाही.

इराणच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात कोणतीही औपचारिक चर्चा सुरू असल्याच्या दाव्यांचे खंडन केले. मात्र, जून महिन्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या शांतता सामंजस्य करार (MoU) अंतर्गत केलेल्या वचनांची अंमलबजावणी पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शविणारे संदेश अमेरिकेकडून प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

इराणी चर्चापथकाशी संबंधित एका सूत्राने अर्ध-सरकारी वृत्तसंस्थेला सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचा निर्णय अमेरिका शांतता करारातील आपल्या आश्वासनांची प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी करते, यावर अवलंबून असेल. तसेच, अमेरिकेच्या वित्त विभागाने बुधवारी एका इराकी विमान कंपनीवरील निर्बंध हटविल्याचा या कराराशी कोणताही संबंध नसल्याचेही सूत्राने स्पष्ट केले.

इराणने २८ फेब्रुवारी रोजी होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण अधिक कडक करत इस्रायल, अमेरिका तसेच त्यांच्या सहयोगी देशांशी संबंधित जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीवर निर्बंध लादले होते. अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ले केल्यानंतर तेहरानने हा निर्णय घेतला होता.

गेल्या महिन्यात अमेरिकन सैन्याने इराणमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. होर्मुझ सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर इराणकडून झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेने सांगितले होते. व्यापारी सागरी वाहतुकीला धोका निर्माण करण्याची इराणची क्षमता कमकुवत करणे हा या कारवाईचा उद्देश असल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले होते.या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे परिसरातील अमेरिकेचे लष्करी तळ आणि इतर लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणखी तीव्र झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande