परभणी - आंदोलक कर्मचाऱ्यांनी रस्ता अडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मागील महिनाभरापासून विविध मागण्यांसाठी महापालिका मुख्यालय परिसरात कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक कर्मचारी विविध मार्गांचा अ
अ


परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)।

परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मागील महिनाभरापासून विविध मागण्यांसाठी महापालिका मुख्यालय परिसरात कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक कर्मचारी विविध मार्गांचा अवलंब करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयापुढील राष्ट्रीय महामार्गावर घंटागाडीतील कचरा उलथवून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे के. के. भारसाखळे, विनायक ठाकूर, नासेर खान, व्हीएस उपाडे, गौतम जोंधळे, राहुल पंडित आणि इतर दहा-बारा आंदोलकांवर नवा मोंढा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

नवा मोंढा पोलिसांचे पोलीस हवालदार मळजीराम मुजमुले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, महापालिका कर्मचाऱ्यांचे मागील महिनाभरापासून महापालिका मुख्यालय परिसरात आंदोलन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिका परिसरात कर्तव्यावर असताना संघटनेचे नासेरखान, के के भारसाकडे, व्हीएस उपाडे, विनय ठाकुर, गौतम जोंधळे, राहुल पंडित आणि तर दहा-बारा आंदोलन जोरजोरात घोषणा देऊन गोंधळ करीत होते. त्यानंतर कुठलीही पूर्वसूचना न देता आंदोलन महापालिका कार्यालयाकडून महामार्गावर घंटागाडी क्रमांक एमएच २२ एएन ३२१२ या वाहनास चालकासह थांबून गाडीमधील सर्व कचरा रस्त्याच्या मधोमध टाकून रहदारीस अडथळा निर्माण केला. तसेच आंदोलनाची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता रस्त्यावरील वाहने थांबून जोरजोरात घोषणाबाजी केली. यावेळी सरायक पोलीस निरीक्षक खंदारे यांनी आंदोलकांना असे करणे बेकायदेशीर असल्याचे सांगूनही आंदोलकांनी त्याकडे लक्ष दिले नाही. यावरून सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमान्वये नवा मोंढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार भागवत नागरगोजे हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande