विशेष शिबिरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 389 अर्ज प्राप्त
छत्रपती संभाजीनगर, 12 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरात झालेल्या 28 विशेष शिबीरात कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी जिल्ह्यात मंडळस्तरावर 28 शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये आतापर्यंत एकूण 389 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हाध
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरात झालेल्या 28 विशेष शिबीरात कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी जिल्ह्यात मंडळस्तरावर 28 शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये आतापर्यंत एकूण 389 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी दिली आहे.

तालुकानिहाय प्राप्त अर्जांमध्ये उप विभाग छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शिबिरात 44, उपविभाग येथे पैठण व फुलंब्रीमधील 143, उपविभाग वैजापूर व गंगापूर मधील 37, उपविभाग कन्नड खुलताबाद मधील 153, उपविभाग सिल्लोड व सोयगाव मधील 12 असे एकूण 389 अर्जांचा समावेश आहे.

प्राप्त 389 अर्जांपैकी समितीअंतर्गत 270, तर गॅझेटअंतर्गत 255 अर्ज आहेत. काही प्रस्तावांची ऑनलाइन प्रक्रिया बाकी असून, उर्वरित प्रकरणांवर तालुकास्तरीय वंशावळ समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande