
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
घरकुलाच्या मागणीसाठी गोदा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
गंगाखेड तालुक्यातील खळी येथील अनेक लाभार्थी नागरिकांनी घरकुलाचे सर्व काम करूनही तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना काम पूर्ण केल्याबाबत पुरावे देऊनही घरकुलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विजय सोन्नर, उमाजी जाधव, तुकाराम पवार, ज्ञानदेव पवार, दादाराव राठोड, लक्षण जाधव, बापूराव पवार, उत्तम हरिश्चंद्र पवार, विष्णू राठोड, आंतराम जाधव आदी सहभागी झाले. या जलसमाधी आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. ओंकार पवार यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis