लातूर - प्रशासकीय कार्यालय वास्तूच्या भूमिपूजन समारोहासाठी कव्हेकरांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रण
लातूर, 12 सप्टेंबर (हिं.स.) भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मुंबई दौर्यावर असताना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी आ. कव्हेकर यांन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार


लातूर, 12 सप्टेंबर (हिं.स.) भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मुंबई दौर्यावर असताना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी आ. कव्हेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मनःपूर्वक स्वागत केले.

या सदिच्छा भेटीदरम्यान माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यामध्ये लातूर जिल्ह्यासह राज्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सविस्तर व प्रदीर्घ चर्चा झाली. विशेषतः मराठवाड्यात व लातूर जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकर्यांसमोरील अडचणी, पावसाअभावी निर्माण झालेली गंभीर परिस्थिती तसेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक ती मदत मिळण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर करण्यात येणार्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर येथे प्रस्तावित असलेल्या विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीसंदर्भातही व प्रशासकीय कार्यालय तसेच इतर वास्तूच्या भूमिपूजन समारोहासाठी निमंत्रण दिले. त्याचा स्वीकार ना.सुनेत्राताई पवार यांनी केल्याचे माजी आ.कव्हेकर यांनी सांगितले. यावेळी लातूर आणि परिसरातील उदयोन्मुख खेळाडूंना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच मराठवाड्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला अधिक गती मिळावी, या दृष्टीने विभागीय क्रीडा संकुलाची उभारणी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून सदरील क्रीडा संकुलाचे काम गतीने करण्यात यावे, अशा सुचनाही त्यांनी यावेळी बोलताना दिल्या.

उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार या सामाजिक, औद्योगिक आणि पर्यावरणविषयक क्षेत्रातही कार्यरत असून, राज्याच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही या भेटीदरम्यान व्यक्त करण्यात आला. माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची ही सदिच्छा भेट अत्यंत आपुलकीच्या व सकारात्मक वातावरणात पार पडली. लातूर जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित प्रश्नांसह शेतकरी, युवक आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर झालेल्या चर्चेमुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande