नांदेडचे भूमिपुत्र डॉ. व्यंकट गीते यांचा सत्कार
नांदेड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेडचे भूमिपुत्र डॉ. व्यंकट गीते यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल नांदेडकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्का
अ


नांदेड, 12 सप्टेंबर (हिं.स.)।

नांदेडचे भूमिपुत्र डॉ. व्यंकट गीते यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल नांदेडकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे, लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांसह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेडच्या भूमिपुत्राची महाराष्ट्रातील आरोग्य शिक्षणाच्या सर्वोच्च संस्थेच्या नेतृत्वपदी झालेली नियुक्ती ही संपूर्ण नांदेडसाठी अभिमानाची बाब आहे. डॉ. व्यंकट गीते यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा विद्यापीठाच्या प्रगतीस निश्चितच लाभ होईल. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!असे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande