रविवारी योगेश्वरी शुगर्सचा गळीत हंगाम अग्निप्रदीपन सोहळा
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। तालुक्यातील लक्ष्मीनगर-लिंबा येथील योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. यांच्या सन २०२६-२७ या २५व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाने करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवारी(दि. १) सकाळी १० वाजता कारखान
रविवारी योगेश्वरी शुगर्सचा गळीत हंगाम अग्निप्रदीपन सोहळा


परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)।

तालुक्यातील लक्ष्मीनगर-लिंबा येथील योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. यांच्या सन २०२६-२७ या २५व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाने करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवारी(दि. १) सकाळी १० वाजता कारखाना स्थळी आयोजित करण्यात आला आहे.

याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन अँड. रोहित आर. देशमुख, त्यांच्या पत्नी उत्कर्षा रोहित देशमुख, तसेच डायरेक्टर राहुल आर. देशमुख आणि डॉ.अभिजीत आर. देशमुख यांच्या शुभहस्ते बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अग्निहोत्री रंगनाथ महाराज सेलूकर यांची उपस्थिती असेल. आगामी ऊस गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. पाटील, टेक्निकल डायरेक्टर प्रकाश वाय. चांदगुडे तसेच सर्व प्रमोटर मंडळ, अधिकारी व कामगार वर्ग परिश्रम घेत आहेत. या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यास ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड वाहतूक ठेकेदार, अधिकारी, कामगार व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande