पुणे - मुलाखतीच्या तयारीसाठी एमपीएससी उमेदवारांना बार्टीची मदत
पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या ‘अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२५’ उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या (एससी) उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे
barti


पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या ‘अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२५’ उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या (एससी) उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

एमपीएससीच्या अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना आता मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. या मुलाखतीची तयारी करताना आर्थिक अडचणी येऊ नयेत तसेच उमेदवारांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने बार्टीने ही योजना सुरू केली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. योजनेची सविस्तर जाहिरात तसेच ऑनलाइन अर्जाचा नमुना बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्यातील एमपीएससी गट-ब मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र एससी उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande