पुणे - गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसविरोधात विशेष तपासणी मोहीम
पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)।गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बसविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ११ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही मोहीम सुरू र
पुणे - गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसविरोधात विशेष तपासणी मोहीम


पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)।गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बसविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ११ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही मोहीम सुरू राहणार असून, शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी बसचालक-मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.गणेशोत्सवासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून खासगी बसमालकांकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी आरटीओकडे प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स आणि बसेसची तपासणी करून जादा भाडे आकारणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) संबंधित संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सध्याचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाने त्या संवर्गाच्या बससाठी येणाऱ्या भाड्याच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक भाडे आकारता येणार नाही. तसेच एसटीच्या प्रवासी तिकिटाच्या दराच्या दीडपटपेक्षा जादा भाडे आकारण्यास मनाई आहे.खासगी बसमालक आणि चालकांनी आपल्या वाहनाची सर्व कागदपत्रे वैध असल्याची खात्री करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जात असल्यास किंवा प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास प्रवाशांनी नाव, भ्रमणध्वनी क्रमांक आणि तिकिटाचे छायाचित्र यासह ८२७५३३०१०१ या क्रमांकावर किंवा mh12prosecution.rtopune@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आरटीओकडून कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande