छ. संभाजीनगर : ओपीडीतील रुग्णांसाठी घाटीत स्वतंत्र औषधालय सुरू
छत्रपती संभाजीनगर, १४ सप्टेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र औषधालय सुरू करण्यात आले आहे. रुग्णांची गैरसोय आणि औषधे घेण्यासाठी
Q


छत्रपती संभाजीनगर, १४ सप्टेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र औषधालय सुरू करण्यात आले आहे.

रुग्णांची गैरसोय आणि औषधे घेण्यासाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने ओपीडीच्या पहिल्या मजल्यावर हे औषधालय सुरू करण्यात आले.

या औषधालयाचे उद्घाटन घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांच्या हस्ते करण्यात आले. ओपीडीत उपचार घेतल्यानंतर रुग्णांना आता जवळच औषधे उपलब्ध होणार असल्याने त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

याशिवाय तळमजल्यावरील औषधालयात होणारी गर्दी कमी होण्यासही या सुविधेमुळे मदत होणार आहे. रुग्णांना अधिक सुलभ, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande