खडकवासला कालव्यात कचरा अन् सांडपाणी; उरुळी कांचनसह अनेक गावांचे आरोग्य धोक्यात
पुणे, 14 सप्टेंबर (हिं.स.)। नव्या खडकवासला कालव्यात पुणे शहरातील मोठ्या प्रमाणात केरकचरा व घाण वाहून येत असल्याने उरुळी कांचनसह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्याचा स्रोत दूषित होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याव
Dam


पुणे, 14 सप्टेंबर (हिं.स.)। नव्या खडकवासला कालव्यात पुणे शहरातील मोठ्या प्रमाणात केरकचरा व घाण वाहून येत असल्याने उरुळी कांचनसह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्याचा स्रोत दूषित होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खडकवासला धरण साखळीमधून इंदापूरपर्यंत शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खडकवासला कालव्याद्वारे केला जातो. पुणे शहरातून हा कालवा जात असताना त्याच्या परिसरातील नागरी वस्त्यांमधून केरकचरा, सांडपाणी आणि इतर प्रकारची घाण कालव्यात टाकली जात असल्याने पाण्याचा प्रवाह दूषित होत असल्याचे सांगितले जात आहे.या दूषित पाण्यावर पुढील गावांना अवलंबून राहावे लागत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यात ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनांच्या जल शुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा सक्षम नसल्याने शुध्द पिण्याचे पाणी गावातील जनतेला मुळातच मिळत नाही त्यात या घाण पाण्याची भर त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्न या गावांवर ओढवला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande