
सोलापूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)।
गणेश चतुर्थीच्या पावन दिनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या ‘राधाश्री’ निवासस्थानी श्री गणरायाचे मंगलमय वातावरणात आगमन झाले. कोठे परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चाराच्या गजरात गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी नगरसेवक प्रथमेश कोठे, डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात गणरायाची आरती करण्यात आली.
“विघ्नहर्त्या बाप्पांच्या चरणी सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो. जनसेवेची नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळो,” अशी मनोभावे प्रार्थना आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली.
गणरायाच्या आगमनामुळे ‘राधाश्री’ निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड