जालना जिल्ह्यात १२ लाख नागरिकांची आरोग्य तपासणी
छत्रपती संभाजीनगर, १४ सप्टेंबर (हिं.स.)। जालना जिल्ह्यात ३० वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांसारख्या असंसर
जालना जिल्ह्यात १२ लाख नागरिकांची आरोग्य तपासणी


छत्रपती संभाजीनगर, १४ सप्टेंबर (हिं.स.)। जालना जिल्ह्यात ३० वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात येणार आहे.

आगामी

१० डिसेंबरपर्यंत सात टप्प्यांत हे विशेष अभियान राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील पात्र नागरिकांची आरोग्य तपासणी करून आजारांचे लवकर निदान करण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषतः कोणतीही लक्षणे नसतानाही संभाव्य आजारांची तपासणी करून घेणे आणि वेळेत उपचार सुरू करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

जिल्ह्यातील ३० वर्षांवरील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. नियमित आरोग्य तपासणीमुळे असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान होऊन त्यावर योग्य उपचार करणे शक्य होणार आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande