लातूरमध्ये अत्याधुनिक ‘वायू बस’ सेवेचा शुभारंभ
लातूर, १४ सप्टेंबर (हिं.स.) : अत्यंत गतिमान पद्धतीने विकसित होत असलेल्या लातूर शहरात अत्याधुनिक बससेवा सुरू होत असल्याचा आनंद आहे. अद्ययावत बसमधून लातूरकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायी होईल, असा विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्
अमित देशमुख


लातूर, १४ सप्टेंबर (हिं.स.) : अत्यंत गतिमान पद्धतीने विकसित होत असलेल्या लातूर शहरात अत्याधुनिक बससेवा सुरू होत असल्याचा आनंद आहे. अद्ययावत बसमधून लातूरकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायी होईल, असा विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.

लातूर येथील प्रतापसिंह बिसेन, गोविंदलाल सोनी आणि बालाजी पिंपळे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘वायू बस’ (एसी स्लीपर कोच) सेवेचा शुभारंभ आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते रिंग रोडवरील ‘द सेलिब्रेशन रिसॉर्ट’ येथे फीत कापून करण्यात आला. यावेळी त्यांनी नूतन बसची पाहणी केली.

कार्यक्रमाची सुरुवात पवनपुत्र हनुमान आणि नीम करोली बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, लातूरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूर-मुंबई पहिली शासकीय ‘लालपरी’ सुरू करण्यासोबतच रेल्वे आणि विमानसेवा लातूरला आणली. आता नव्या पिढीने नव्या विचारांनी लातूरचे नाव पुढे नेण्याचे काम सुरू ठेवले आहे.

‘वायू बस’ परिवाराच्या माध्यमातून चार बसद्वारे छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी शहरांसाठी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि आनंददायी प्रवास देण्याबरोबरच त्यांचा विश्वास कायम राखण्याची जबाबदारी सेवा देणाऱ्यांनी पार पाडावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.

बससेवा २४ तास तत्परतेने उपलब्ध ठेवून वेळापत्रक आणि थांब्यांचे काटेकोरपणे पालन करावे. ‘अतिथी देवो भव’ या उक्तीप्रमाणे ग्राहकाला ईश्वर मानून अत्याधुनिक आणि दर्जेदार सेवा देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, लातूरमध्ये चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थना करून आमदार देशमुख यांनी उपस्थितांना गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मिनीयार यांनी केले. त्यांनी ‘वायू बस’ सेवेची सविस्तर माहिती दिली. लातूर शहर महानगरपालिकेचे उपमहापौर ऍड. स्नेहल उटगे, प्रकाश कासट, ॲड. गणेश गोमसाळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून ‘वायू बस’ परिवाराला पुढील व्यवसायवाढीसाठी शुभेच्छा दिल्या.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande