बीडच्या तळेगाव येथे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रास्ता रोको
बीड, 14 सप्टेंबर (हिं.स.)। परळी वैजनाथ परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी तळेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. अचानक वीजपुरवठा खंडित होणे, वारंवार होणारे वीजखंडित आण
आंदोलन


बीड, 14 सप्टेंबर (हिं.स.)। परळी वैजनाथ परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी तळेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. अचानक वीजपुरवठा खंडित होणे, वारंवार होणारे वीजखंडित आणि त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली.

वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, घरगुती कामे तसेच शेतीशी संबंधित कामांवरही परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेक वेळा तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.तळेगाव येथे करण्यात आलेल्या रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande