परभणी पोलीसांच्या वतीने आदर्श गणेशोत्सव पुरस्कार योजना जाहीर
परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.)।सार्वजनिक गणेशोत्सव डीजे - डॉल्बीमुक्त, शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा याकरिता परभणी पोलीसांच्या वतीने आदर्श गणेशोत्सव पुरस्कार योजना जाहीर करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी, डीजे - डॉल्बीमुक्त गणेशोत्सव,
परभणी पोलीसांच्या वतीने आदर्श गणेशोत्सव पुरस्कार योजना जाहीर


परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.)।सार्वजनिक गणेशोत्सव डीजे - डॉल्बीमुक्त, शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा याकरिता परभणी पोलीसांच्या वतीने आदर्श गणेशोत्सव पुरस्कार योजना जाहीर करण्यात आली आहे.

या पुरस्कारासाठी, डीजे - डॉल्बीमुक्त गणेशोत्सव, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वयंसेवक, मूर्ती सजावट व देखावा, गणेश मंडळाची स्वच्छता, गणेश भक्तासाठी देण्यात आलेल्या सुविधा, महिलांचा सहभाग, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन, कायद्याचे पालन आणी विविध स्पर्धांचे आयोजन यासाठी गुणदान करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक घटकासाठी १० असे एकूण १०० गुण देण्यात येतील. यासाठी समिती प्रत्यक्ष मंडळास भेट देऊन पाहणी करेल. त्यातून आदर्श गणेश मंडळ निवडण्यात येतील. पुरस्कारासाठी, पोलीस ठाणे स्तरावर तीन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर एक आणी जिल्हा स्तरावर तीन आदर्श गणेश मंडळ निवडण्यात येतील. निवडलेल्या मंडळास मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande