
परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.)। महिला सरपंचाच्या अंगावर धावत जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी जिंतूर तालुक्यातील कोठातांडा येथील दोन जणांवर चारठाणा पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात कोठातांडा येथील महिला सरपंच आशामती संतोष पवार यांनी फिर्याद दिली असून फिर्यादी सरपंच महिला व तिची जाऊ मिराबाई नामदेव पवार या दोघी शेतात जात असतांना गावातील गणपती मंदीराजवळील रस्त्यावर दोघांनी महिला सरपंचास मला सही द्या, असे म्हणत अंगावर धावत जाऊन अवाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन जणांवर चारठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार कालवने हे अधिक तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis