‘यावेळी तरी सरकारने मागण्या पूर्ण कराव्यात’- सौमित्रा जरांगे
छत्रपती संभाजीनगर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे मुंबईकडे निघाल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली असून, यावेळी तरी सरकारने त्यांच्
‘यावेळी तरी सरकारने मागण्या पूर्ण कराव्यात’- सौमित्रा जरांगे


छत्रपती संभाजीनगर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे मुंबईकडे निघाल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली असून, यावेळी तरी सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी केली आहे. तसेच, यावेळी सरकारची चूक पदरात घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

मनोज जरांगे यांच्या मुंबईकडे रवाना होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे म्हणाल्या की, यावेळी तरी सरकारने निर्णय घेतलाच पाहिजे. दोन वेळेस ते आले आणि दोन्ही वेळेस त्यांना परत पाठवण्यात आले. मात्र, यावेळी तरी त्यांना परत पाठवू नये.”

सरकारने आतापर्यंत नेमके काय दिले आहे, हे स्पष्टपणे सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली. “सरकारने काय दिलेले आहे, मग त्यांनी ते स्पष्ट सांगायला पाहिजे ना. ते सांगत नाहीत, काय दिलंय म्हणून. फक्त ‘दिलं, दिलं’ हे आम्ही रोज टीव्हीवर ऐकतो. मात्र, नेमकं काय दिलं आहे, हे सरकारने स्पष्ट सांगायला पाहिजे असे सौमित्रा जरांगे म्हणाल्यात

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या कन्या पल्लवी जरांगे यांनीही सरकारला इशारा दिला आहे. “आमच्या वडिलांना काही झाले, तर त्याला सरकार जबाबदार राहील,” असा इशारा त्यांनी दिला. मुंबईत गेल्यानंतर त्यांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सरकारची असेल, असेही कुटुंबीयांनी स्पष्ट केले.

गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या मुंबईकडे रवाना होण्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande