
नाशिक, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मंगळवारी (दि. १५) सुरू आहे. त्यांच्या या आंदोलनाला भक्कम पाठिंबा देण्यासाठी अंबड गाव व पंचक्रोशीतील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच करणार असल्याची माहिती साहेबराव दातीर यांनी दिली.
अंबड येथे आयोजित समाजबांधवांच्या बैठकीत मनोज जरांगे सांगतील तोच अंतिम आदेश मानून
आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. शासनाने मुंबई आंदोलनासाठी परवानगी नाकारली असली, तरी शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने मुंबई गाठणारच, असा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यावेळी साहेबराव दातीर, विक्रम दातीर, शांताराम फडोळ, नवनाथ भवर, गोरख दातीर, अविनाश टिळे, ज्ञानेश्वर भावनाथ, मनोज दातीर, शरद कर्डीले, सचिन इंगोले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI