
परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.)। गेल्या दीड-दोन महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यासह अन्यत्र पावसाने दडी मारल्यामुळे व सर्वदूर सर्वसामान्य शेतकर्यांसह सामान्य माणूस चिंतातूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाथरी येथील जमीयत-ए-उलेमा तर्फे तीन रोजा नमाज अदा करण्यात आली.
पाथरी शहरातील इदगाह मैदानावर आयोजित केलेल्या या सामुहीक नमाज मध्ये मौलाना मोहम्मद रफिक नदवी यांनी प्रस्तावना केली. तर मस्जिद सय्यद शादात दर्गाहचे इमाम मुफ्ती असलम साहाब काशमी यांनी नमाज अदा केली व सर्वदूर चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थना केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis