
नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
महानगरपालिका कार्यालयात सौ. कविता संतोष मुळे, महापौर यांच्या उपस्थितीत शहरातील विविध कामे आणि नागरिकांच्या समस्यांबाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या विविध अडचणी व प्रश्न महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. प्रत्येक प्रश्न समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात आणि शहरातील विकासकामांना गती मिळावी, यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis