
छत्रपती संभाजीनगर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६ मध्ये छत्रपती संभाजीनगरने देशातील १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ४८ शहरांमध्ये १६ वा क्रमांक पटकावला. शहराला २०० पैकी १७८ गुण मिळाले असून, मागील वर्षीच्या ३४ व्या क्रमांकावरून यंदा तब्बल १८ स्थानांची सुधारणा झाली आहे. धूळ नियंत्रण, कचरा व्यवस्थापन, कचरा जाळण्यास प्रतिबंध आणि यांत्रिक साफसफाईमुळे कामगिरी उंचावली. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई आणि नाशिकलाही शहराने मागे टाकले. मात्र, रस्त्यांवरील धूळ, खड्डे आणि खोदकामामुळे नागरिकांकडून प्रत्यक्ष स्वच्छ हवेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis