
विविध वयोगटांत युवा बुद्धिबळपटूंची चमकदार कामगिरी
विजेत्यांचा रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देऊन गौरव
परभणी, १५ सप्टेंबर (हिं.स.) : समर्थ चेस अकॅडेमी, परभणी यांच्या वतीने कै. प्रा. शंकर गंधम सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. विविध वयोगटांत झालेल्या या स्पर्धेत युवा बुद्धिबळपटूंनी कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेते
अंडर-९ मुले :
प्रथम : सुशांत शिवभक्त — ₹१,३०० व स्मृतीचिन्ह
द्वितीय : मीत सोलंकी — ₹१,००० व स्मृतीचिन्ह
तृतीय : पूर्वीक अग्रवाल — ₹७०० व स्मृतीचिन्ह
अंडर-९ मुली :
प्रथम : श्रेया शेळके — ₹१,३०० व स्मृतीचिन्ह
द्वितीय : स्वरा जाधव — ₹१,००० व स्मृतीचिन्ह
तृतीय :
दिव्या सूर्यवंशी — ₹७०० व स्मृतीचिन्ह
अंडर-१२ मुले :
प्रथम : वरद पैंजणे — ₹१,३०० व स्मृतीचिन्ह
द्वितीय : सर्वेश भिसे — ₹१,००० व स्मृतीचिन्ह
तृतीय : कृष्णा शिराळे — ₹७०० व स्मृतीचिन्ह
अंडर-१२ मुली :
प्रथम : देवश्री गावंडे — ₹१,३०० व स्मृतीचिन्ह
द्वितीय : मनुश्री ईनामदार — ₹१,००० व स्मृतीचिन्ह
तृतीय : अनुश्री वसमतकर — ₹७०० व स्मृतीचिन्ह
अंडर-१७ मुले :
प्रथम : स्वराज लखोटिया — ₹१,३०० व स्मृतीचिन्ह
द्वितीय : आयुष वडगांवकर — ₹१,००० व स्मृतीचिन्ह
तृतीय : अथर्व मिटकरी — ₹७०० व स्मृतीचिन्ह
अंडर-१७ मुली :
प्रथम : समृद्धी कातळे — ₹१,३०० व स्मृतीचिन्ह
द्वितीय : ज्ञानश्री गावडे — ₹१,००० व स्मृतीचिन्ह
तृतीय : अनुष्का मुठा — ₹७०० व स्मृतीचिन्ह
स्पर्धेच्या माध्यमातून युवा बुद्धिबळपटूंना स्पर्धात्मक वातावरणात आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. कै. प्रा. शंकर गंधम सर यांच्या स्मृती जपण्याबरोबरच जिल्ह्यातील नवोदित बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने समर्थ चेस अकॅडेमीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis