पशुधन विमा योजनेसाठी अर्ज सुरू; शेतकरी-पशुपालकांनी लाभ घेण्याचे आवाहन
पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)।विविध आजार, अपघात आणि नैसर्गिक आपत्तींपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (NLM) ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेसाठी शेतकरी व पशुपालकांकडून ऑनलाइ
पशुधन विमा योजनेसाठी अर्ज सुरू; शेतकरी-पशुपालकांनी लाभ घेण्याचे आवाहन


पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)।विविध आजार, अपघात आणि नैसर्गिक आपत्तींपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (NLM) ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेसाठी शेतकरी व पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र पशुपालकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

पूर, वीज पडणे, अपघात, विषबाधा तसेच अन्य कारणांमुळे पशुधनाचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास संबंधित पात्र पशुपालकांना या विमा योजनेतून आर्थिक दिलासा मिळणार आहे. विमा हप्त्याच्या ८५ टक्के रकमेचा भार केंद्र व राज्य शासन उचलणार आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा अनुक्रमे ६०:४० टक्के राहणार असून, लाभार्थी पशुपालकाला केवळ १५ टक्के हिस्सा भरावा लागणार आहे.

राज्यभरात योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे ‘ॲग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड’ (AIC)ची निवड करण्यात आली आहे. विमा प्रीमियमचे दर एक वर्षासाठी ४.३० टक्के, दोन वर्षांसाठी ७.५० टक्के आणि तीन वर्षांसाठी १०.५० टक्के निश्चित करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande