
बूथ प्रमुख व बीएलए-2 सहकाऱ्यांना रावसाहेब दानवेंचे मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर, 15 सप्टेंबर (हिं.स.) : भोकरदन येथे ‘एसआयआर’ मोहिमेच्या नियोजनासंदर्भात आव्हाना व वालसा (व.) जिल्हा परिषद गटातील सर्व बूथ प्रमुख, बीएलए-2 आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी दानवे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून SIR मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने बूथ पातळीवर विशेष दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
सध्या 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत मतदार यादीतील नावांवर हरकती नोंदविणे तसेच नवीन पात्र मतदारांची नावे नोंदविण्यासाठी दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या महत्त्वपूर्ण कालावधीत गावागावांतील एकही पात्र नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी बूथ प्रमुख आणि BLA-2 सहकाऱ्यांनी नागरिकांना थेट सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून त्या अचूक करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा तसेच पात्र नागरिकांना आवश्यक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करावे, असेही यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीस आव्हाना व वालसा (व.) जिल्हा परिषद गटातील विविध पदाधिकारी, बूथ प्रमुख, BLA-2 सहकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis