माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार - आ. संतोष दानवे
छत्रपती संभाजीनगर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : देशरक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान करणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले आद्यकर्तव्य असल्याचे भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी सांगितले. भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानी भो
W


छत्रपती संभाजीनगर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : देशरक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान करणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले आद्यकर्तव्य असल्याचे भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी सांगितले.

भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानी भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातील वीर माजी सैनिक बांधवांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी सैनिकांनी विविध प्रलंबित मागण्या आणि अडीअडचणी आमदार दानवे यांच्यासमोर मांडल्या. या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देऊन देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांच्या प्रत्येक रास्त मागणीची प्राधान्याने पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही आमदार दानवे यांनी दिली. तसेच आवश्यक प्रश्न शासनस्तरावर मांडून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिक बांधवांशी झालेला संवाद प्रेरणादायी असल्याचे आमदार दानवे यांनी यावेळी सांगितले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande