फुलंब्री येथे पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त 'आशीर्वादाचा दिवा
छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ''आशीर्वादाचा दिवा'' या उपक्रमात सहभागी होत आमदार सुहास शिरसाट फुलंब्री येथे दिवा प्रज्वलित केला. याच ठिकाणी विद्यार्थ्यांकरता आधुनिक वसतिगृह
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'आशीर्वादाचा दिवा' या उपक्रमात सहभागी होत आमदार सुहास शिरसाट फुलंब्री येथे दिवा प्रज्वलित केला. याच ठिकाणी विद्यार्थ्यांकरता आधुनिक वसतिगृह बांधणीचे काम सध्या प्रगतिपथावर असून, नरेंद्रजी मोदी यांच्या उद्दिष्टातील केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांचे हे एक जिवंत उदाहरण आहे.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज '२०४७ पर्यंत विकसित भारत' या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करत आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना हे याच संकल्पाचे मूर्त स्वरूप आहे. फुलंब्रीसारख्या ग्रामीण भागातही होत असलेली ही वसतिगृह उभारणी म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याच्या मोदीजींच्या दृष्टिकोनाचेच प्रतिबिंब आहे.

. मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या अखंड सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, राष्ट्रसेवेचा हा प्रवास आणि 'सेवा संकल्प' अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी केला. हा दिवा केवळ प्रकाशाचा नाही, तर सेवा, समर्पण आणि विकसित भारताच्या संकल्पनेचा प्रकाश आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande