पुणे मनपाच्या आरोग्य, हिरकणी कक्षासह बॅरिकेडिंगची स्वतंत्र निविदा रद्द
पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणुकीसाठी आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष, स्वागत मंडप आणि बॅरिकेडिंगच्या कामांसाठी एकाच प्रभागात चार स्वतंत्र निविदा काढण्याचा प्रकार अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या आदेशाने थांबविण्यात आल
pmc


पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणुकीसाठी आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष, स्वागत मंडप आणि बॅरिकेडिंगच्या कामांसाठी एकाच प्रभागात चार स्वतंत्र निविदा काढण्याचा प्रकार अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या आदेशाने थांबविण्यात आला आहे. एकाच स्वरूपाचे आणि एकाच ठिकाणी होणारे काम चार तुकड्यांत विभागून स्वतंत्र निविदा काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर या निविदा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. संपूर्ण कामासाठी एकच निविदा काढण्याच्या सूचना नायर यांनी विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाला दिल्या आहेत.गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष, स्वागत मंडप आणि बॅरिकेडिंगची कामे करण्यात येणार आहेत. या सर्व कामांचे एकत्रित नियोजन करून एकाच निविदेद्वारे प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande