गणेशोत्सवातून लोकजागृती: लातूरमध्ये 'लोकसंवाद-२०२६' अभियानाचा शुभारंभ!
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.) महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य जपत शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबवला जात आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आनं
गणेशोत्सव


लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.) महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य जपत शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबवला जात आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) येथील संयुक्त गणेश मंडळातून या अभियानाची धमाकेदार सुरुवात झाली आहे.

लातूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित या उपक्रमात

जिल्हा खादी ग्रामोद्योग विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने नागरिकांना व युवकांना खालील योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली:

तरुणांसाठी व्यवसाय संधी: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी १७.५० लाखांपर्यंतचे अनुदान.

शेतकऱ्यांसाठी डिजिटल सेवा: महाकृषी विस्तार एआय ॲप आणि खतांच्या नोंदणीसाठी एफएफएस ॲप. महाडीबीटी पोर्टलद्वारे शेततळे, फळबाग लागवडीच्या योजनांचे ऑनलाइन अर्ज.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande