
रत्नागिरी, 19 सप्टेंबर (हिं.स.) । कोकण रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या सहकार्याने मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड मार्गावर आजपासून दोन जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, या विशेष गाड्यांचा तपशील असं - गाडी क्र. ०१००९ / ०१०१० मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी स्पेशल. ट्रेन क्र. ०१००९ मुंबई CSMT – सावंतवाडी रोड स्पेशल गाडी २६/०९/२०२६ रोजी मुंबई सीएसएमटीवरून दुपारी १३:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३:०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात
ट्रेन क्र. ०१०१० सावंतवाडी रोड – मुंबई सी एस एम टी स्पेशल गाडी २७/०९/२०२६ रोजी सावंतवाडी रोडवरून पहाटे ४:०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१५ वाजता मुंबईला येथे पोहोचेल.
या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या २२ डब्यांच्या विशेष ट्रेनमध्ये ३-टायर एसी (२ कोच), स्लीपर (१२ कोच), जनरल (०६ कोच) आणि एसएलआर/डी (२) डबे असतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी