कृषिमंत्री दत्ता भरणेकडून नांदेड जिल्ह्याच्या दुष्काळ परिस्थिती पाहणी
नांदेड, 19 सप्टेंबर (हिं.स.)।नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे हे नांदेड जिल्ह्याच्या दुष्काळ परिस्थिती पाहणी करण्यास आले असता यावेळी नांदेड जिल्ह्या व तालुका शेतकरी,शेती आणि कृषी क्षेत्राशी संबंधित वि
Q


नांदेड, 19 सप्टेंबर (हिं.स.)।नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे हे नांदेड जिल्ह्याच्या दुष्काळ परिस्थिती पाहणी करण्यास आले असता यावेळी नांदेड जिल्ह्या व तालुका शेतकरी,शेती आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील सद्यस्थितीतील दुष्काळसदृश परिस्थिती,पावसाचे अनियमित प्रमाण,शेती पिकांचे नुकसान, दुष्काळग्रस्त शेतकरी अशा विविध समस्या याबाबत कृषिमंत्री दत्तामामा भरणे साहेब यांना सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा असे निवेदन देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देत,त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.जिल्ह्यातील कृषी शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा व मदत मिळण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या सदिच्छा भेटीप्रसंगी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब आमदार राजेशजी पवार तसेच माझ्या गावातील शेतकरी गोविंदराव गंगारामजी धुमाळ पाटील चांदोजी सटवाजी धुमाळ पाटील साहेबराव श्रावणजी धुमाळ पाटील पिराजी पाटील धुमाळ आदिनाथ माणिकराव धुमाळ तेजस धुमाळ पप्पू धुमाळ विनायक धुमाळ असे शेतकरी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande