मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली
छत्रपती संभाजीनगर, 08 सप्टेंबर (हिं.स.)मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत खूपच खालावली आहे. जालना येथील सिव्हिल सर्जन (CS) यांनी तपासणी केली असता त्यांची शुगर लेव्हल खूपच कमी झाल्याचे आढळून आले असून, त्यांचे वजन 7 किलोने कमी झाले आहे आणि
Q


छत्रपती संभाजीनगर, 08 सप्टेंबर (हिं.स.)मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत खूपच खालावली आहे. जालना येथील सिव्हिल सर्जन (CS) यांनी तपासणी केली असता त्यांची शुगर लेव्हल खूपच कमी झाल्याचे आढळून आले असून, त्यांचे वजन 7 किलोने कमी झाले आहे आणि त्यांना चक्कर येत आहे.

ही बाब कळताच मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना फोन करून संपर्क साधला. त्यांनी आज दिनांक 8 सप्टेंबर पासून सर्व प्रश्नांवर काम सुरू करून ते मार्गी लावतो, असे आश्वासन दिले आणि सलाईन घेण्याची विनंती केली.

या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री 2:30 वाजता सलाईन घेण्यास होकार दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande