वंदे भारत एक्सप्रेसची कसारा घाटात चाचणी
नाशिक, 5 फेब्रुवारी (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली वंदे भारत एक्सप्र
वंदे भारत एक्सप्रेस


नाशिक, 5 फेब्रुवारी (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली वंदे भारत एक्सप्रेस आज इगतपुरी स्थानकात चाचणीसाठी दाखल झाली होती. येत्या १० फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी मुंबई येथून या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सदर गाडीचा महत्त्वाचा मानला जाणारा कसारा घाटामध्ये चढते की नाही याची (चाचपणी ) तपासणीसाठी आज दुपारी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून जवळपास 11 वाजता निघाली आणि इगतपुरी दरम्यान ती एक ते दीड ते वाजेच्या सुमारास आली. या गाडीमध्ये रेल्वेचा ठराविक स्टाफ व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

ही गाडी विशेष म्हणजे कसारा घाट सेक्शन असल्याने येणाऱ्या रेल्वे गाडीस घाट चढण्यासाठी मागून बँकर (इंजिन) लावावे लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेसने बिना बँकर घाट पार केला असून तिला कुठल्याही प्रकारचे बँकर लावण्यात आलेले नाहीत. या गाडीच्या दोन ते तीन दिवस चाचणीसाठी फेऱ्या होणार आहेत असे रेल्वे प्रशासनाने सांगितले .

वंदे भारत ट्रेन बघण्यासाठी नागरिकांनी इगतपुरी स्थानकावर गर्दी केली होती. सदरील गाडी मंगळवार वगळता नियमितपणे मुंबई-शिर्डी धावणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सकाळी 6.वाजून 15 मिनिटांनी शिर्डीकडे रवाना होणार आहे. तर शिर्डी रेल्वे स्थानकात दुपारी 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत पोहोचणार आहे. तर शिर्डीहून सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने निघणार आहे, तर मुंबईत रात्री 11 वाजून 18 मिनिटांनी पोहोचणार आहे. असा एकूण वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई ते शिर्डी 5 तास 55 मिनिटात प्रवास होणार आहे. मुंबई-सोलापूर बरोबरच मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस होत असल्याने साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande