अकोला : एमपीएससी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
अकोला, २५ मे(हिं.स.)- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नाग
अकोला : एमपीएससी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश


अकोला, २५ मे(हिं.स.)- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२३ रविवार दि.४ जून रोजी सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे. अकोला जिल्ह्यात १६ उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्र व परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच केंद्रा बाहेरील १०० मिटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

अकोला शहरातील---१) खंडेलवाल ज्ञान मंदिर कॉन्व्हेंट, विजय हाऊसिंग सोसायटी, गोरक्षण रोड, २) जागृती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, रणपिसे नगर, ३) श्रीमती राधादेवी गोएनका महिला महाविद्यालय, मुर्तिजापूर रोड, नेहरू पार्क जवळ, ४)भारत विद्यालय, तापडिया नगर, ५) श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा देशमुख पेठ, शिवाजी पार्कजवळ, अकोट रोड, ६) भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, गोडबोले प्लॉट, डाबकी रोड, जुने शहर, ७) उस्मान आझाद ऊर्दू हायस्कूल, रतनलाल प्लॉट चौक, ८) गुरुनानक विद्यालय, गांधीनगर, सिंधी कॅम्प,९)सिताबाई कला महाविद्यालय, सिव्हील लाईन, १०) ज्युबिली इंग्लिश हायस्कूल – ज्युनिअर कॉलेज, रामदास पेठ पोलीस स्टेशन जवळ,११) श्रीमती मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय, गोडबोले प्लॉट, डाबकी रोड जुने शहर, १२) न्यु इंग्लिश हायस्कूल, शिक्षण संकूल, रामदास पेठ पोलीस स्टेशन जवळ, १३) डी.ए. व्ही. कॉन्व्हेंट स्कूल, महात्मा गांधी रोड, १४) सावित्रीबाई फुले जि.प. माध्यमिक कन्या शाळा, दामले चौक, वसंत देसाई स्टेडियम रोड, १५) मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट सिव्हिल हॉस्पिटल समोर, १६) राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णिवाल सायन्स कॉलेज सिव्हिल लाईन रोड. या केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

प्रतिबंधात्मक आदेशानुसार, परीक्षा केंद्राच्या परिसरात पाच पेक्षा जादा व्यक्तिंना एकत्ररित्या प्रवेश करता येणार नाही. घोषणा देता येणार नाही. शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. १०० मिटर परिसरातील झेरॉक्स सेंटर , पान पट्टी. लॅपटॉप, टायपिंग सेंटर, ध्वनिक्षेपक आदी माध्यमे परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. अनधिकृत व्यक्तीस प्रवेश मनाई असेल. प्रतिबंधात्मक आदेश परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख ठेवणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना परीक्षेसंबंधित कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने लागू राहणार नाहीत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande