ठाणे जिल्ह्याची अवस्था दयनिय - नाना पटोले
डोंबिवली, २५ मे (हिं.स.) : रस्त्यावर कचरा, शहराची दुरावस्था झाली आहे. ठाणे जिल्ह्यात आदिवासी लोकांना
ठाणे जिल्ह्याची अवस्था दयनिय - नाना पटोले


डोंबिवली, २५ मे (हिं.स.) : रस्त्यावर कचरा, शहराची दुरावस्था झाली आहे. ठाणे जिल्ह्यात आदिवासी लोकांना रस्ता नाही, पिण्याचे पाणी नाही, आरोग्य व्यवस्था नाही. मुंबईजवळ असणाऱ्या ठाणे जिल्ह्याची अशी ही दयनिय अवस्था झाली आहे. मोठे पद मिळाल्यानंतरही शिंदे चांगले काम करू शकले नाहीत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डोंबिवलीत केली.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी मानव अधिकार एव सूचना अधिकार विभाग याच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी गौरव पुरस्कार सोहळा डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश सभागृहात आयोजित केला होता.या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पटोले डोंबिवलीत आले होते.

डोंबिवलीतील काँग्रेस नेते तथा प्रदेश सदस्य संतोष केणे यांच्या निवासस्थानी पटोले यांनी प्रथम भेट दिली. प्रदेशाध्यक्ष डोंबिवलीत आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मरगळ दूर झाली. प्रथमच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते पटोलेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

यावेळी पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी विविध विषयांवर बोलतांना त्यांनी सांगितले की, नवीन संसदीय इमारतीचे उदघाटन करत असताना पंतप्रधानांनी संसदीय मूल्य जोपासली पाहिजेत. पण राज्यकर्त्याना ते समजत नाही. राष्ट्रपती हे लोकसभेचे आणि राज्यसभेचे प्रमुख असतात. राष्ट्रपती पद हे संविधनिक पद मोठे आहे. कॅबिनेट निर्णयाची मान्यता राष्ट्रपतीकडून घेतली जाते. सर्व पक्ष एकत्र यावे अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. देशात लोकशाही मजबूत करण्याचे काम संविधानने केली आहे. मात्र संविधानच संपविण्याचे काम होत म्हणून त्याला विरोध केला आहे.

तर प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर त्यांनी सांगितले की, ते महाविकास आघाडीत नाहीत त्यांनी काय बोलावे हे त्याचे मत आहे. तसेच ज्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यादिवशी शिंदे- फडणवीस सरकार पडेल या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. एका मंत्र्याला चार पाच जिल्हे कामांसाठी दिले आहेत तसेच पालकमंत्री म्हणून काम पाहावे लागत आहे. मोदींची तानाशाही आहे, सरकार म्हणजे जनतेची लूट करणारी व्यवस्था आहे. या सरकारचा दहा वर्षांचा कालावधीत लोकांना समजला आहे. फक्त हे सरकार स्वप्न दाखवत आहे. आता स्वप्न भंग झाले आहे. २०१४ व २०१९ ची कथा सांगायची गरज नाही. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. देशात निवडणुका लावा सर्व घमंड उतरेल. तर दोन हजाराची नोट बदली वर त्यांनी सांगितले की, आता जनता पंतप्रधान बदलतील. पूर्वीची चूक लक्षात लोकांच्या लक्षात आली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande