अमरावती : आमदार खोडकेंनी बजावला मतदानाचा अधिकार
अमरावती, 26 एप्रिल (हिं.स.) : अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज २६ एप्रिल २०२४ रोजी शा
अमरावती : आमदार खोडकेंनी बजावला मतदानाचा अधिकार


अमरावती, 26 एप्रिल (हिं.स.) : अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज २६ एप्रिल २०२४ रोजी शांततेत मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. गाडगे नगर स्थित शासकीय तंत्रनिकेतन येथील मतदान केंद्रांवर आ. सुलभा खोडके व संजय खोडके यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत मतदान केले. तदनंतर आपल्या बोटावरची शाई दाखवून अन्य मतदान बांधवांना सुद्धा मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान हा लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आहे. मतदान करणे आपला अधिकार असून, त्याचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करा. मी सहकुटुंब मतदान केले आहे, आपण सर्वांनी मतदान कराव. सगळ्यांनी मतदानासाठी घराबाहेर पडलं पाहीजे, असे आवाहन आ. सुलभा खोडके यांच्या वतीने करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande