मालेगाव - बाजारात भरदिवसा वृध्दाचा खून
मालेगाव , 1 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील कॅम्प भागातील बाजारात वयोवृद्ध व्यक्तीचा हत्याराने खून करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, कॅम्पचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी अधिकार
मालेगाव - बाजारात भरदिवसा वृध्दाचा खून


मालेगाव , 1 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील कॅम्प भागातील बाजारात वयोवृद्ध व्यक्तीचा हत्याराने खून करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, कॅम्पचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

सकाळी सव्वाआठला येथील महानगरपालिकेने बांधलेल्या सोमवार बाजारातील छत्रपती संभाजी भाजी मंडईतील ६० क्रमांकाच्या ओट्यावर प्रकाश काशीनाथ पाचारे या साठवर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह मिळून आला. मयताच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अनिल बाबूराव पवार (रा. पवार गल्ली, मालेगाव कॅम्प) यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कॅम्प पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठवला. मयत पाचारे यांच्या खुनाचे कारण अद्याप समोर आले नसून छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक जाधव तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande